निवडणुकीच्या तोंडावर भरमसाठ आश्वासने देणे, ही बाब काही नवीन नाही. पाच वर्षांत सगळ्याच वस्तूंचे भाव वाढलेले असताना अगदी निवडणुकीच्या आधीच कसे भाव कमी होतात, हे कळण्याइतपतसुद्धा लोक समजदार झालेत. या सगळ्यामध्येच पेट्रोलनं शंभरी पार केलेली असताना दोन रुपयांनी भाव कमी झाले. आता याला दिलासा म्हणावं की अजून काही, हे ज्याचं त्याने ठरवावं. वजन करण्यासाठी काट्यावर उभं राहिल्यावर खिशातला रुमाल काढून ठेवला, तर वजनात फरक पडेल काय?