कायम आठवणीत राहील असा आवाज!
कधी कधी एखादी अशी बातमी ऐकायला मिळते, जी ऐकून विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. सोशल मिडियावर उगाच स्क्रोल करता करता एखादी पोस्ट दिसावी आणि बोटं तिथेच थांबवीत, असंच काहीसं माझ्यासोबत झालं. के. के. नावाने सुप्रसिद्ध असलेले गायक आपल्यातून निघून गेले. खरं सांगू? मला तर त्यांचं वय किती, हेही माहीत नव्हतं. कायम प्रसन्न चेहरा, लाईमलाईटपासून नेहमी […]
समर्पित अभिनेत्याची “हाफ सेंच्युरी”
वर्ष २०१४ असेल बहुतेक. दक्षिणेकडचे सिनेमे हिंदीत डब करून टी.व्ही. वर बघायचा नाद उच्च कोटीपर्यंत पोचलेला. काहीतरी “रियल डॉन रिटर्न्स” नावाचा सिनेमा पाहिला तुमचा! मग नेटवर सर्च करुन जरा माहिती घेतली. अजून एखादी झलक पाहायला म्हणून तुमचे अजून १-२ सिनेमे पाहिले. तसं आमची फॉलोइंग तमिळ सिनेमाकडे आणि आमच्या तलईवाकडे जास्त, म्हणूनच ‘तलपति’ पाहिला. आमच्या हीरोला टक्कर देणारा अजून एक हिरो? तोही केरळमधून? मल्याळम सिनेमामधून? मग हळूहळू तुमच्याकडे फॉलोइंग वळवली. हे सगळं करत असताना तुम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारलीय, हे कळल्यावर बोलतीच बंद! ती भूमिका करणारा माणूस सामान्य असूच शकत नाही, याचा पुरावा youtube ने देऊन टाकला. जितकं लांब तुमचं नाव, त्याहून दूरवर पसरलेली तुमची कीर्ती! मोहम्मद कुट्टी अर्थात आमचे लाडके मामूटी, तुम्ही सिनेसृष्टीत ५० वर्षं पूर्ण केलीत, हे खरंच वाटत नाही. […]
हैप्पी बर्थडे तलईवा!
“S-U-P-E-R-S-T-A-R R-A-J-N-I” ही १४ अक्षरं येऊन जाईपर्यंत कानाच्या कानठळ्या बसण्याइतका आवाज (त्यात माझा घसा बसेपर्यंत मीही आरडाओरडा केलाय)….हा अनुभव, नव्हे आनंद शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.