शेवटचा टप्पा – तिरुवनंतपुरम
इतक्या दिवस प्रवास केल्याचा थोडासा शरीरावर परिणाम जाणवत होता. मागचे १३-१४ दिवस सतत प्रवास करत होतो. एक शेवटचा टप्पा फक्त तेवढा राहिलेला होता. तो पार करुन परत घरीच! कन्याकुमारी पासून तिरुवनंतपुरमपर्यंत सगळं अंतर रस्त्याने जायचं होतं. भौगोलिकदृष्ट्या तमिळनाडूची हद्द पार करुन आम्ही केरळमध्ये शिरणार होतो. कन्याकुमारी ते तिरुवनंतपुरम हे अंतर सुमारे १०४ किमी आहे. परंतु, हे पूर्ण करायला जवळपास ४ तासांचा वेळ लागतो. याला कारण म्हणजे रस्त्याची रुंदी! आपण जातो ती एक लेन आणि समोरून येणारी एक लेन, यामुळे ओव्हरटेक हा प्रकार टाळावा लागतो, त्यामुळे हा कालावधी आपोआपच वाढतो. तिरुवनंतपुरमला जायच्या रस्त्यावरच पद्मनाभपुरम या ठिकाणी पद्मनाभपुरम महाल आहे, कन्याकुमारी शहरापासून जवळपास ४० किलोमीटरच्या अंतरावर! भारतातील हा सर्वात जुना महाल असावा, असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. एकेकाळी हे ठिकाण म्हणजे त्रावणकोर राजांची राजधानी […]
स्मारकांच्या जगात – कन्याकुमारी (२)
वेळ हळूहळू करत निघून चाललेला होता. त्यामुळे तो वाया घालणे म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे अशी स्थिती होती.
स्मारकांच्या जगात – कन्याकुमारी (१)
सूर्योदय असा लाईव्ह मॅच सारखा समोर दिसत होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सूर्य कसा उगवतो ते बघत होतो. आत्तापर्यंत अर्धवट उघडे असलेले डोळे, तो सूर्योदय बघून पूर्णपणे उघडले गेले.
पूर्वेकडील अथेन्स – मदुराई
धार्मिक केंद्राबरोबरच हे औद्योगिक केंद्र आहे. ज्यात सूत कातणे, रंगवणे, लाकडावरील कोरीवकाम ह्या आणि इतर अनेक लहान मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.
अध्यात्माच्या सान्निध्यात – रामेश्वरम् (२)
मंदिराची सध्या असलेली रचना ही १२ व्या शतकातील पांड्य राजवंशाने त्यांच्या काळात केलेली आहे.
अध्यात्माच्या सान्निध्यात – रामेश्वरम् (१)
हे भारताचं असं एक टोक आहे जिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे मिळालेले दिसून येतात. अगदी दोन्ही समुद्रांचे रंग देखील वेगळे आणि ओळखू येण्याइतके स्पष्ट दिसतात.
न टाळता येणारा एक कंटाळवाणा दिवस
६ वाजता एकदाची घोषणा झाली आणि मी कसल्यातरी गोष्टीवर विजय मिळवल्याचा मला आनंद झाला.
प्रवासाचं मध्यांतर – पुदुचेरी
पुदुचेरी. भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. भारतावर जरी ब्रिटिशांनी राज्य केलेलं असलं, तरी पुदुचेरीमध्ये जास्त करून फ्रेंचांचं वास्तव्य होतं. तशा खुणा किंवा बांधकामाची पद्धत अजूनही पॉन्डीचेरीमध्ये दिसून येते. २० सप्टेंबर, २००६ या दिवशी औपचारिकरित्या पॉन्डीचेरी हे नाव बदलून ते “पुदुचेरी” असं झालं. पुदुचेरी हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ “नवीन गाव” असा होतो. तमिळनाडू […]
स्वप्नपूर्ती अर्थात् चेन्नई! – भाग: २
ती नेम प्लेट पाहूनच माझं समाधान झालेलं होतं. आपलं पुन्हा येणं होईल की नाही, म्हणून तिथे किमान डझनभर फोटो काढून घेतले.
स्वप्नपूर्ती अर्थात् चेन्नई! – भाग: १
हॉटेलच्या रूममधून पारंपारिक पद्धतीची तिथली दिसणारी घरं, माझ्या आधीच ओसंडून वाहणाऱ्या आनंदात भर टाकण्यासाठी पुरेशी होती.