Browsing: प्रवासवर्णन

शहर छोटं असलं तरी ते व्यवस्थित आहे. विमानतळापासून जवळच असलेल्या पद्मावती मंदिरापासूनच हे लक्षात येतं. धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथे मंदिरांची संख्या जास्त आहे. पण अगदी टिपिकल दाक्षिणात्य लोक, त्यांचं राहणीमान, तिथली घरं, हे सगळं पाहण्यासारखं आहे.

इथे फिरायचं म्हणजे केवळ बसमधून फिरणे नाही. बसमध्ये असलेला गाईड तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी (क्वचित मल्याळम सुद्धा) भाषेतून एकेक ठिकाणाविषयी चालत्या बसमधून सांगत राहतो.

एकंदरीत या शहराचं वातावरण बघून आपण आपल्या दक्षिण भारत भ्रमणाची सुरुवात अगदी योग्य ठिकाणाहून केलेली आहे, याची खात्री झाली. दुसऱ्या दिवशी पासून या शहरात फिरायचं आहे, यासाठी मी सकाळची वाट बघत होतो.