सामान्य माणसाचं स्वप्न पडद्यावर दाखवणारा – वन

सामान्य लोकांच्या आयुष्यात असा नेता जो त्यांच्या अडचणी सोडवतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, मला वाटतं लोकांना अशा प्रकारचा एक नेता हवा असतो.

कायम आठवणीत राहील असा आवाज!

कधी कधी एखादी अशी बातमी ऐकायला मिळते, जी ऐकून विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. सोशल मिडियावर उगाच स्क्रोल करता करता एखादी पोस्ट दिसावी आणि बोटं तिथेच थांबवीत, असंच काहीसं माझ्यासोबत झालं. के. के. नावाने सुप्रसिद्ध असलेले गायक आपल्यातून निघून गेले. खरं सांगू? मला तर त्यांचं वय किती, हेही माहीत नव्हतं. कायम प्रसन्न चेहरा, लाईमलाईटपासून नेहमी […]

डिसकनेक्टेड : भाग-७

‘यारी, दोस्ती’ वगैरे गोष्टी काय आम्ही कधी एकमेकांना सिद्ध करून दाखवल्या नाहीत. ‘माझा मित्र असशील तर हे करुन दाखव’ वगैरे फालतू गोष्टींचीही आम्हाला कधी गरज पडली नाही.

समर्पित अभिनेत्याची “हाफ सेंच्युरी”

वर्ष २०१४ असेल बहुतेक. दक्षिणेकडचे सिनेमे हिंदीत डब करून टी.व्ही. वर बघायचा नाद उच्च कोटीपर्यंत पोचलेला. काहीतरी “रियल डॉन रिटर्न्स” नावाचा सिनेमा पाहिला तुमचा! मग नेटवर सर्च करुन जरा माहिती घेतली. अजून एखादी झलक पाहायला म्हणून तुमचे अजून १-२ सिनेमे पाहिले. तसं आमची फॉलोइंग तमिळ सिनेमाकडे आणि आमच्या तलईवाकडे जास्त, म्हणूनच ‘तलपति’ पाहिला. आमच्या हीरोला टक्कर देणारा अजून एक हिरो? तोही केरळमधून? मल्याळम सिनेमामधून? मग हळूहळू तुमच्याकडे फॉलोइंग वळवली. हे सगळं करत असताना तुम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारलीय, हे कळल्यावर बोलतीच बंद! ती भूमिका करणारा माणूस सामान्य असूच शकत नाही, याचा पुरावा youtube ने देऊन टाकला. जितकं लांब तुमचं नाव, त्याहून दूरवर पसरलेली तुमची कीर्ती! मोहम्मद कुट्टी अर्थात आमचे लाडके मामूटी, तुम्ही सिनेसृष्टीत ५० वर्षं पूर्ण केलीत, हे खरंच वाटत नाही. […]

मैत्रीचे विविध पैलू दाखवणारा – इरुवर

चित्रपट – इरुवरभाषा – तमिळदिग्दर्शक – मणी रत्नम्कलाकार – प्रकाश राज, मोहनलाल, नासर, ऐश्वर्या रॉय, गौतमी, तब्बू, रेवतीसंगीत – ए. आर. रहमान एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर सिनेमा येणे ही आजकाल नवीन गोष्ट राहिलेली नाही. कधी कधी त्या त्या व्यक्तींची परवानगी घेऊन सिनेमा बनवला जातो, तर काही वेळेस त्यात बदल करुन मग तो सिनेमा सत्य घटनांपासून प्रेरित (आधारित) आहे, असं सांगून तो […]

डिसकनेक्टेड : भाग-६

‘तळपायाची आग मस्तकात जाणे’ हे आम्हाला फक्त ऐकून माहीत होतं. पण “अभ्यास कर, मगच खेळायला सोडीन” हे वाक्य ऐकल्यावर आमची अशीच काहीतरी अवस्था होत असे. आम्ही बंड किंवा आगाऊ असू, पण घरचे नाही म्हटले तरी जाईनच वगैरे फिल्मी विचार कधी आमच्या मनाला शिवले नाहीत.

डिसकनेक्टेड : भाग-५

(भाग-४ पासून पुढे…) त्या ट्युशनमध्ये जायला सुरुवात केली खरी, पण रोज जायला इतकं जीवावर यायचं की एखाद्या दिवशी वाटायचं- घरून निघावं आणि जाऊच नये ट्युशनला. पण काय करणार? पापभिरू आणि भित्रा स्वभाव. आधीचं सांगू इच्छितो की, दांड्या मारणे म्हणजे काही खूप हिमतीचे काम नाही आणि जे दांड्या मारत नाहीत, ते फार भित्रे असतात असंही नाही. माझ्यावरचा प्रसंग आहे म्हणून मी सांगत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार. असो. कदाचित दोन महिने झाले असावेत. मला तिटकारा असलेल्या आणखी एका गोष्टीला सामोरं जायचं होतं- ट्युशन टेस्ट! आणखी विचित्र प्रकार म्हणजे ४५ मार्कांची टेस्ट होती ती. पेपर एक तर २०, ३० ४०, ५०, ८० किंवा १०० या मार्कांचे असतात. हे ४५ काय? मी धरून ६ जण असतील कदाचित. तो छोटेखानी पेपर काय, दरवाज्यातून आला आणि खिडकीतून गेला – म्हणजे होऊन गेला एकदाचा. ३-४ दिवसानंतर जाहीररित्या त्याच्यावर विचारमंथन अर्थात निकाल मिळणार होता. “तुला कळतंय का या सहाही लोकांमध्ये तू शेवटचा आहेस, तुला कमी […]

डिसकनेक्टेड : भाग-४

दुसऱ्या दिवशी पहिलाच बाउन्सर माझ्या नाकावर आदळला. मी खाली बसलो. नाक दुखतंय म्हणून नाकाला हात लावला. बोटाला रक्त लागलं होतं.