Close Menu
विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास

    आजच सबस्क्राईब करा!

    नव्याने पोस्ट केलेले ब्लॉग वाचण्यासाठी.

    Facebook X (Twitter) Instagram
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    Facebook X (Twitter) Instagram
    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    • प्रवासवर्णन
    • चित्रपट
    • प्रासंगिक
    • कथा
    • व्यंगचित्रे
    • मनोगत
    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    Home » अप्पू
    प्रासंगिक

    अप्पू

    ओंकारBy ओंकारOctober 31, 2026Updated:October 31, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मी २९ ऑक्टोबर ही तारीख क्वचितच विसरू शकेल. मला चांगलं आठवतं – ‘रिमोट वर्क’ वाली माझी नोकरी होती तेव्हा. अंदाजे दुपारच्या सुमारास Twitter वरच्या एका नोटिफिकेशनने मला धक्काच बसला. अप्पू गेल्याची बातमी होती. मी काय खूप डायहार्ड फॅन होतो, असं नाही. पण वाचून वाईट वाटलं. कन्नडा सिनेमातला सुपरस्टार – पुनीत राजकुमार, रुपेरी पडद्यावर पूर्ण नाव येत असलं तरी आमच्यासारख्या सिनेरसिकांसाठी तो “अप्पू”च होता. थोड्याच वेळात फीड मध्ये किंवा स्टेटसवरती अप्पूचे फोटो झळकू लागले. लोक जुने व्हिडीओ पोस्ट करु लागले.

    अप्पूचे वडील राजकुमार, हे सुद्धा आपल्या काळात स्टार हिरो होते. त्यांची विशेषता होती, की सिनेमात ते कुठलाही असा सीन करणार नाहीत, ज्यात हिरो सिगारेट ओढतोय किंवा दारू पितोय. ही अट मान्य झाल्याशिवाय ते पिक्चर साईन करत नसत. मी अप्पूचे जितके सिनेमे पहिले त्यात मलाही आठवत नाही की, त्याने असा कुठला शॉट दिला असेल. तो लोकांच्यामधला हिरो होता. कदाचित आपण सिनेमात असं काही केलं आणि त्याचं कुणी अनुकरण केलेलं कदाचित योग्य ठरणार नाही, असं त्याला वाटलं असावं. जेव्हा एखादा माणूस एका अशा उंचीवर पोचलेला असतो, जिथे त्याचं एक वाक्यसुद्धा एका मोठ्या समुदायाचं विचार करणंच फिरवू शकतं, तेव्हा त्या वळणावर असे निर्णय घेणं खूप कमी लोकांना जमतं. आज काल ही प्रजाती नामशेष होत चाललीय, तो भाग वेगळा.

    अप्पूच्या सिनेमापेक्षा तो आम्हा मित्रमंडळीत ‘डान्सर’ म्हणून जास्त लोकप्रिय होता. ‘प्रभुदेवानंतर डान्स करावा तो अप्पूनेच’ ही मला तेव्हाही अतिशयोक्ती वाटत नव्हती, आजही वाटत नाही, आणि कदाचित कधीच वाटणार नाही. मध्यंतरी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने बालकलाकार म्हणून अभिनय केलेल्या सिनेमांचे रील्स बघण्यात आले. गोंडस शब्द बहुतेक अयोग्य ठरेल, पण काय दिसायचा तो तेव्हा!

    कधी BMTC, Karnataka Milk Federation यासारख्या संस्थांचा चेहरा म्हणून तो उभा राहिला, कधी Right to Education च्या अंतर्गत गरजू लोकांच्या शिक्षणासाठी झटला, तर कोविड-१९ च्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावला. एका वाचलेल्या वृत्तानुसार त्याने तेव्हा त्याच्या फॅन्सना देखील ‘तुम्ही तुमच्या परीने तुमच्या जवळपासच्या लोकांची मदत करा’ म्हणून विनंती केली होती. हे म्हणजे “आधी केले, मग सांगितले” या उक्तीचंच उदाहरण नाही का? आम्ही लहान होतो तेव्हा वाचण्यात आलं होतं की, ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’, अप्पू तर सगळ्यांचा आवडता होता. त्यामुळे त्या ईश्वरालाही तो आवडला असावा. अचानक चटका लावून गेला खरा, पण त्याने सुरु केलेली कितीतरी चांगली कामं सोडून गेला.

    आज त्याला जाऊन पाच वर्षं झाली. पण तो गेलाय, हे अजूनही खरं वाटत नाही. अचानक कधीतरी त्याचा नवीन पिक्चर येईल आणि आपण ट्रेलर बघून ‘कुठे जाऊन तो सिनेमा बघायचा’ याचं प्लॅनिंग करू, असंच वाटतं. कारणही तसंच आहे ना, ४६ हे काय जाण्याचं वय थोडीच आहे. मी कधी त्याचे सिनेमे सेलिब्रेट केले नाहीत, किंवा त्याने राबवलेल्या उपक्रमात सहभाग घेतला नाही, किंवा त्याचा मी कधी लाभार्थीही नव्हतो. आजही त्याचा विषय कधी मित्रांमध्ये बोलण्यात आला, तरी मी तेच म्हणतो, जे त्याच्या गेल्याच्या दिवशी तोंडून निघालं होतं – “अप्पू खूपच लवकर गेला”.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    ओंकार
    • Facebook
    • X (Twitter)
    • Instagram
    • LinkedIn

    संबंधित पोस्ट्स

    कायम आठवणीत राहील असा आवाज!

    June 1, 2022

    समर्पित अभिनेत्याची “हाफ सेंच्युरी”

    August 6, 2021
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    आज काय नवीन?

    स्वप्नपूर्ती अर्थात् चेन्नई! – भाग: २

    December 19, 2018

    विकासाचे “उड्डाण”

    November 7, 2023

    कॉलेजमधली अनोखी कथा – वेलीपडीन्ते पुस्तकम्

    May 18, 2020

    सिल्वर स्क्रीन – कथा पडद्यामागची…(भाग – १)

    October 25, 2023

    आजच सबस्क्राईब करा!

    नव्याने पोस्ट केलेले ब्लॉग वाचण्यासाठी.

    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    © 2026 सर्व हक्क प्रकाशकाधीन.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.