वेळ हळूहळू करत निघून चाललेला होता. त्यामुळे तो वाया घालणे म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे अशी स्थिती होती.
Author: ओंकार
सूर्योदय असा लाईव्ह मॅच सारखा समोर दिसत होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सूर्य कसा उगवतो ते बघत होतो. आत्तापर्यंत अर्धवट उघडे असलेले डोळे, तो सूर्योदय बघून पूर्णपणे उघडले गेले.
धार्मिक केंद्राबरोबरच हे औद्योगिक केंद्र आहे. ज्यात सूत कातणे, रंगवणे, लाकडावरील कोरीवकाम ह्या आणि इतर अनेक लहान मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.
मंदिराची सध्या असलेली रचना ही १२ व्या शतकातील पांड्य राजवंशाने त्यांच्या काळात केलेली आहे.
हे भारताचं असं एक टोक आहे जिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे मिळालेले दिसून येतात. अगदी दोन्ही समुद्रांचे रंग देखील वेगळे आणि ओळखू येण्याइतके स्पष्ट दिसतात.
६ वाजता एकदाची घोषणा झाली आणि मी कसल्यातरी गोष्टीवर विजय मिळवल्याचा मला आनंद झाला.
पुदुचेरी. भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. भारतावर जरी ब्रिटिशांनी राज्य केलेलं असलं, तरी पुदुचेरीमध्ये जास्त करून फ्रेंचांचं वास्तव्य होतं. तशा खुणा किंवा बांधकामाची पद्धत अजूनही पॉन्डीचेरीमध्ये दिसून येते. २० सप्टेंबर, २००६ या दिवशी औपचारिकरित्या पॉन्डीचेरी हे नाव बदलून ते “पुदुचेरी” असं झालं. पुदुचेरी हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ “नवीन गाव” असा होतो. तमिळनाडू राज्यात हे असल्यामुळे इथली मुख्य भाषाही तमिळच आहे. “इथून पोचायला जवळपास चार तास लागतील”, असं ड्रायवरने सांगितलं. गाडी एव्हाना हायवेला लागली होती. पाऊस कोणत्याही वेळी येऊ शकतो, अशी चिन्हं होती. चेन्नईच्या बाहेर निघून बराच वेळ झाला तरी रस्ते किंवा लोकवस्त्या अजूनही बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होत्या.…
ती नेम प्लेट पाहूनच माझं समाधान झालेलं होतं. आपलं पुन्हा येणं होईल की नाही, म्हणून तिथे किमान डझनभर फोटो काढून घेतले.
हॉटेलच्या रूममधून पारंपारिक पद्धतीची तिथली दिसणारी घरं, माझ्या आधीच ओसंडून वाहणाऱ्या आनंदात भर टाकण्यासाठी पुरेशी होती.
शहर छोटं असलं तरी ते व्यवस्थित आहे. विमानतळापासून जवळच असलेल्या पद्मावती मंदिरापासूनच हे लक्षात येतं. धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथे मंदिरांची संख्या जास्त आहे. पण अगदी टिपिकल दाक्षिणात्य लोक, त्यांचं राहणीमान, तिथली घरं, हे सगळं पाहण्यासारखं आहे.
